प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 42;

जिल्हाधिकारी किसन जावळे यांचे आवाहन

| उरण | वार्ताहर |

लोकशाही मजबूत बनविण्यासाठी आपण मतदान करणे गरजेचे आहे. मत आपला अधिकार आहे, तशीच आपली जबाबदारीदेखील आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी सांगितले.

190 उरण विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी उरण जासई येथील निवडणूक केंद्राला नुकतीच भेट दिली, तसेच निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. उद्धव कदम, शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
उरण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांनी ही निवडणूक प्रक्रियेसंदर्भात मतदान अधिकारी व निवडणूक प्रक्रियेतील कर्मचारी यांना निवडणूक प्रक्रिया व मतदान केंद्र संदर्भात प्रशिक्षण दिले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. उद्धव कदम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी समीर वाठारकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी समीर जाधव, पोलीस अधिकारी व कर्मचारी ही उपस्थित होते.

Exit mobile version