। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सध्या देशत कबड्डीला चांगले दिवस आहेत. ते टिकवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. हे चांगले दिवस टिकवायचे असतील, तर कबड्डी वाढवली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायाला हवेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील यांनी केले. मुंबई शहर कबड्डी असोसिएशच्या कार्यकारिणीचे शिबीर आलिबाग येथे आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. 2) अॅड. आस्वाद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेही मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह विश्वास मोरे, कार्यउपाध्यक्ष रामचंद्र जाधव, खजिनदार शुभांगी पाटील, सहकार्यवाह भरत मुळे, शरद काळंजण, छत्रपती पुरस्कार विजेते आनंदा शिंदे, संजय सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशच्या तांत्रिक समितीचे प्रमुख जे.जे. पाटील, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह संजय मोकल, उपकार्याध्यक्ष जगदीश पाटील, पंच सुंहास पाटील आदी उपस्थित होते.
मुंबई शहर कबड्डी असोसिएशन दरवर्षी आल्या कार्यकारिणीसाठी शिबीर आयोजित करते. असे शिबीर राज्यातील प्रत्येक जिल्हा कबड्डी संघटनांनी अयोजित करावे. त्यात कबड्डीच्या वाढीसाठी काय करता येईल यावर चार्चा करावी. ज्या काही सूचना असतील, त्या राज्य संघटनेकडे पाठवाव्यात. त्यातील चांगल्या सूचनांचा राज्य संघटना नक्की विचार करेल, असे आश्वासन अॅड. आस्वाद पाटील यांनी यावेळी दिले.