माजी सैनिक काते यांचे निधन

। मुरूड । वार्ताहर ।
माजी सैनिक अजित नामदेव काते यांचे दि. 23 जुलै रोजी सकाळी निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 57 वर्षांचे होते. अल्पशा आजाराने बाधित झाल्याने डोंबिवली येथील सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

भारतीय सैन्यामध्ये 18 वर्षे चालकपदावर त्यांनी सेवा दिली आहे. त्यानंतर ते कष्टम खात्यामध्ये सेवा देत होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक सून व दोन नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगाही सहा वर्षे भारतीय सैन्यामध्ये सेवा देत आहे.

अजित काते यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी त्यांच्या मूळ गावी मुरुड कुंभारवाडा येथे आणण्यात येणार आहे. सोमवार, दि. 1 ऑगस्ट रोजी दशक्रिया विधी मुरुड येथे करण्यात येणार आहे.

Exit mobile version