माजी विदयार्थीनी नीलम पवारचा सत्कार

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

सुधागड तालुक्यातील वर्‍हाड जांभूळपाडा येथील निलम श्याम पवार हिने वाशी मुंबई येथील ‘मेसमेरिक मिस इंडिया पेगिएन्ट 2024’ या स्पर्धेत दैदिप्यमान यश संपादन केले. या स्पर्धेत पवार हिने उत्कृष्ट सादरीकरण करीत ‘फस्ट रर्नर अप’चा मानाचा किताब जिंकला असून सुधागड व रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. तिच्या या यशाबद्दल शेठ ज.नौ. पालीवाला महाविद्यालयात प्राचार्य सुधाकर लहुपचांग यांच्या हस्ते सन्मान आणि सत्कार करण्यात आला.

यावेळी प्राचार्य लहुपचांग यांनी पुढे बोलताना सांगितले की शेठ ज.नौ. पालीवाला महाविद्यालयात शिक्षण घेऊन पुढे गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी गरुड भरारी घेत विविध क्षेत्रात अव्वल स्थान मिळवत राज्य आणि देशपातळीवर अभिमानस्पद कार्य केले आहे. नीलम पवार हिने सौंदर्य स्पर्धेत मिळवलेले यश वाखाणण्याजोगी असून तिने भविष्याच्या काळात या क्षेत्रात अलौकिक यश संपादन करून महाविद्यालयाचे नाव उंचवावे अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्राचार्य डॉ. सुधाकर लहुपचांग, मधुकर बडगुजर, स्नेहल बेलवलकर, अंकुश सोहनी, ज्ञानेश्‍वर मुंढे, यशवंत भांडकोळी, उमेश इनामदार, भारती आरोटे, सरिता देशमुख, जया मचीगर, अपर्णा केदारी, कृष्णा जांभेकर, डॉ. अनील झेंडे, सतू चव्हाण, भक्ती साजेकर आदींसह प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

Exit mobile version