। चिरनेर । प्रतिनिधी ।
फिलान हर्बो मेडिक्स प्राव्हेट लिमिटेडच्यावतीने चिरनेर कातळपाडा येथे मंगळवारी (दि.2) आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. नजम अली कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरात नाडी परीक्षणाद्वारे डॉ. नजम अली कादरी यांनी आजारांचे निदान करून रुग्णांना मार्गदर्शन केले.
शिबीरात परिसरातील नागरिक, अबाल वृद्ध, महिला, विद्यार्थी या सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणी करून घेतली. विशेषता या आयुर्वेदिक शिबीरात थायरॉईड, मुतखडा, मुळव्याध, मधुमेह, कावीळ, दमा, सर्दी, खोकला, सांधेदुखी, गुडघे दुखी, वातरोग, चर्मरोग, पोट वाढणे, स्त्रियांचे आजार, शौचास साफ न होणे, भूक न लागणे, अपचन, केस गळणे, डोकेदुखी, दंत विकार, अल्सर, गॅस, पित्त, जळजळ, अशक्तपणा, वजन वाढविणे, वजन कमी होणे आदी रोगांची तपासणी नाडी परीक्षणाद्वारे करण्यात आली. तसेच, स्त्रियांच्या आरोग्याविषयी माहिती आणि व्यंधत्वाविषयी तपासणी करण्यात आली.