खोदकामाची माती, लोखंडी पाईप रस्त्यालगत

नागरिकांना नाहक त्रास


| पाताळगंगा | वार्ताहर |

आज जिकडे तिकडे खोदकामाचे ग्रहण सुरु आहे. रस्ते चांगले झाले की विविध कामासाठी खोदकाम केले जाते. परिणामी, यापासून अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. सावरोली-खारपाडा या रस्त्यावर वाशिवली येथे एमआयडीसीच्या माध्यमातून या परिसरात नव्याने निर्माण होणाऱ्या कारखान्यांना पाण्याची अवश्यकता मोठी भासत असल्यामुळे पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र, सर्व नियमांची पायमल्ली करुन काम सुरु असल्यामुळे वाहनचालकांस त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या बाजूला केलेले खोदकामाची माती दगड, तसेच लोखंडी पाईप रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात येत असल्यामुळे परिणामी या मार्गावरून प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या ठिकाणी एम.आय.डी.सी च्या माध्यमातून पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम मागील वर्षापासून सुरुच आहे. यामुळे या ठिकाणी खोदकाम केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या ठिकाणी मोहपाडा येथील बाजारपेठेजवळ असल्यामुळे या ठिकाणी शेकडोहून अधिक नागरिक खरेदी करण्यासाठी येत असतात. परिणामी, या ठिकाणी खोदलेली कामाची माती, रस्त्यालगत ठेवण्यात आलेले मोठ मोठे पाईप यामुळे या ठिकाणी प्रवास करताना जणू तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Exit mobile version