ऑलिम्पिकचा रेकॉर्ड मोडत केला बेस्ट थ्रो
| पॅरिस | वृत्तसंस्था |
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिक 2024 नंतर पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसला. यंदा झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देणारा स्टार ॲथलीट नीरज चोप्रा आता एका नव्या अंदाजात दिसला आहे. नीरजने लौजाण डायमंड लीग 2024 मध्ये चमकदार कामगिरी केली आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये केलेला त्याचा विक्रम मोडला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याने 89.45 मीटर भालाफेक करून रौप्यपदक जिंकले होते, परंतु दुखापतग्रस्त असतानाही डायमंड लीगमध्ये त्याने स्वत:चा विक्रम मोडला आहे.
नीरजने मोसमातील सर्वोत्तम थ्रो करत डायमंड लीग 2024 मध्ये दुसरे स्थान मिळविले. नीरज चोप्राने ऑलिम्पिकचा विक्रम मोडत 89.49 मीटर भालाफेक केली, जो या हंगामातील त्याचा सर्वोत्तम थ्रो होता. नीरज चोप्राने डायमंड लीग 2024 मध्ये सहाव्या प्रयत्नात आपला सर्वोत्तम थ्रो केला, परंतु तो 90 मीटरचा टप्पा गाठू शकला नाही आणि त्याचा वैयक्तिक विक्रमही तोडू शकला नाही. नीरज चोप्राच्या कारकिर्दीतील त्याचा सर्वोत्तम थ्रो 89.94 आहे. पण यावेळी त्याने पॅरिस ऑलिम्पिकमधील त्याचा विक्रम मोडला.
भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी (तिसरा लेग) नीरजने दुसरे स्थान पटकावले, परंतु ग्रेनेडाच्या पीटर अँडरसनने 90.61 मीटर भालाफेक करून पहिले स्थान पटकावले. जर्मनीचा ज्युलियन वेबर 87.08 मीटर भालाफेक करत तिसरा राहिला.