| अलिबाग । प्रतिनिधी ।
मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अलिबागच्यावतीने मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश चतुर्थीनिमित्त ही स्पर्धा आयोजित केली आहे. यातून स्पर्धकांना त्यांच्याकडील पाक कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. मंगळवारी (दि.3) पिंपळभाट येथे ही स्पर्धा भरविली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
नामवंत सेलिब्रिटी नलिनी मुंबईकर, हॉटेल इंडस्ट्रीमधील नामवंत शेफ सुरेश पाटील, रॅडिसन ब्लूमधील ज्ञानेश्वर राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पाककलेचे परिक्षण केले जाणार आहे. या स्पर्धेतील प्रवेश मोफत असून ही स्पर्धा विद्यार्थी व खुला अशा दोन गटात घेतली जाणार आहे. विद्यार्थी गटामध्ये सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच खुल्या गटात वीस वर्षावरील स्पर्धकांचा समावेश असणार आहे. स्पर्धेत प्रवेशासाठी 31 ऑगस्ट पूर्वी नोंदणी करणे बंधनकारक आहे.
खाद्यपदार्थ शाकाहारी असावा आणि तो बनवण्यासाठी लागणारे सगळे साहित्य स्पष्टपणे नमूद करावे. पदार्थ घरून करून आणावेत. गोड, तिखट, अशा वेगेवेगळ्या प्रकारचे मोदक स्वीकारले जातील. एका स्पर्धकाला जास्तीत जास्त दोन प्रकार ठेवता येतील. अधिक माहितीसाठी मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट, अलिबाग-पिंपळभाट 9623648916 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.