मुरुडला लाटांचा चित्तथराक क्षण

। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरुडला पाऊस नुकताच सुरु झाला आणि सोमवारी पावसाळ्यातील पहिले उधाण झाले. समुद्र किनारी वार्‍याचा वेग वाढला सुमरे 11 वाजता मोठी भरती सुरु झाली. खोरा बंदर व गायमुख परिसरात 20 फुंचीच्या लाटा धडकल्या. बंदर विभागाकडून जारी केलेल्या भरती ओहोटीच्या वेळापत्रकानुसार यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला सुमारे 26 दिवस मोठी उधाणे होणार आहेत. यातील 15 दिवस किनारपट्टी भागांसाठी धोक्याचे असणार आहे असे हवामान खात्यांनी सांगितले आहे. यादिवशी 2.50 मीटर पेक्षाही उंचीच्या समुद्री उधाणाच्या लाटा किनारपट्टी भागात धडकणार आहेत. 14 व 15 जुलैला मोठी भरती असणार आहे. या दिवशी दुपारी 2.66 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. याच काळात किनारपट्टी भागात अतिवृष्टी झाल्यास नदी नाल्याच्या मुखांजवळील गावात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होते. त्यामुळे आपत्ती यंत्रणाही सज्ज झालेली दिसून येत आहे.

Exit mobile version