आर्यन्स फ्रेंड्स फाऊंडेशनची कार्यकारिणी जाहीर

| खोपोली | प्रतिनिधी |

रायगड जिल्हासह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात कला, क्रीडा, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात आपल्या अनोख्या कार्यशैलीने ओळखल्या जाणाऱ्या आर्यन्स फ्रेंड्स फाऊंडेशन या मान्यता प्राप्त संस्थेची नवीन कार्यकारिणी पदाधिकारी याची निवड प्रक्रिया पार पडली.

यामध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी जगदिश मरागजे यांची अध्यक्षपदी तर नायक प्रवीण सावंत यांची सचिव पदी निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणी जाहीर झाली असून ती पुढील प्रमाणे:- अध्यक्ष जगदिश सुभाष मरागजे, कार्याध्यक्ष महेंद्र सावंत, उपाध्यक्ष सुधीर मुसळे व प्रमोद सावंत, सचिव प्रविण सावंत, सहसचिव मंगेश सावंत, खजिनदार सागर मोरे यांची निवड करण्यात आली. वरील सर्व पदाधिकारी यांचे प्रमुख मार्गदर्शक एम.डी. चाळके तसेच मा.अध्यक्ष प्रशांत साळुंखे, दिनेश मरागजे, सचिन जाधव, अनिल सावंत, प्रकाश चाळके, विजय मुसळे यांनी अभिनंदन केले.

संस्थेने आजतागायत कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रम घेऊनअनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले आहेत. तसेच संस्थेच्या माध्यमातून 10 व 12 विद्यार्ध्याना मार्गदर्शन व मोफत परिक्षेउपयोगी वस्तूंचे दरवर्षी वाटप केले जाते.

Exit mobile version