केअर ऑफ नेचरची कार्यकारिणी जाहीर

| उरण | वार्ताहर |

केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यकारिणीतील पदाधिकार्‍यांची नव्याने नवनियुक्ती करण्यात आली. सोबतच संस्थेच्या मागील काही वर्षांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच येणार्‍या पुढील वर्षासाठीच्या कामकाजांची सर्वसाधारण वाटचाल ठरविण्यात आली. सोबतच संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या विशेष कार्यक्रमांप्रसंगी संस्थेचे सदस्य आणि पदाधिकारी आपल्या संस्थेच्या ड्रेसकोड मध्ये असावेत या प्रांजळ भावनेतून प्रत्येक सदस्यांना आणि पदाधिकार्‍यांना प्रत्येकी सुंदर जॅकेट्सच्या वाटपाचं नियोजन देखील करण्यात आले.

Exit mobile version