। माणगाव । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचारिका संघटना एनपीजी शाखा रायगडची कार्यकारिणी सभा रविवारी (दि.16) ग्रुप ग्रामपंचायत वडखळ येथे पार पडली.
यावेळी कैलास चौलकर यांनी संघटनेविषयी इत्यंभूत सर्व माहिती सांगून संघटनेच्या कामकाजाचे महत्व सांगितले. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचारिका संघटनेच्या राज्याध्यक्ष मीनाक्षी मुदगल यांनी रायगड जिल्हा परिषद परिचारिका संघटना कार्यकारणी आणि उपस्थित एलएचवी व एएनएम यांचे कौतुक करून संघटनेला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांनी देखील मार्गदर्शन केले.
या सभेला संघटनेच्या राज्याध्यक्षा मिनाक्षी मुदगल, राज्य कोषाध्यक्षा आम्रपाली गांगुर्डे, पूर्ण जिल्हा संघटक उषा सावके, महासंघाचे पशुवैद्यकीय राज्यसचिव कैलास चौलकर, ग्रामसेवक संघटनेचे कार्याध्यक्ष शैलेश नाईक, जिल्हा व्यवस्थापक अंकुश शेळके, सरपंच शिवानी म्हात्रे आदींसह इतर मान्यवर व पदाधिकारी देखील उपस्थित होते.