खांब येथे गडदुर्ग चित्रांचे प्रदर्शन

| खांब-रोहा । वार्ताहर ।

रोहे तालुक्यातील खांब येथे दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून गडदुर्ग चित्रांचे प्रदर्शन व चित्रफितीद्वारे माहितीचे प्रसारण करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दुर्लक्षित गडांचे जतन व संवर्धन करणार्‍या दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई व स्धानिक इतिहासप्रेमी व पर्यावरणप्रेमी तरूण यांच्या वतीने भरविण्यात आले होते. या कार्यक्रमाचे माध्यमातून विविध गड दुर्ग यांचे चित्रांचे प्रदर्शन व चित्रफितीद्वारे माहितीचे प्रसारण किशोर सावरकर व महेंद्र पार्ठे यांनी केले. यावेळी मानसी चितळकर, मनोज शिर्के, रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे, अविनाश म्हात्रे,कृष्णाराम धनवी, सुरेश जंगम, दत्ता वातेरे, योगेश धामणसे, चंद्रकांत जाधव, सुरेखा पार्ठे, रंजना टवळे, कांचन मोहिते, सुचित परबळकर, मनोज सावरकर, जयवंत कोळी, विशाल बामणे, रूपाली अडगले, अनयशा अडगले, प्रतिक सावरकर, महेंद्र पार्ठे, विशाल इंगोले, भूषण पाटील ग्रामस्थ तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version