। खांब । प्रतिनिधी ।
विविध कृषी विषयक योजनांसाठी महत्वपूर्ण मानल्या जाणार्या अॅग्रिस्टॅग योजनेच्या कामाचा शुभारंभ शुक्रवारी (दि.24) रोहा तालुक्यातील खांब ग्रामपंचायतीत संपन्न करण्यात आला. या शिबिरात सुमारे शंभर शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. तर, खांब ग्रामपंचायतीच्यावतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल शेतकरी वर्गातून समाधानाची भावना व्यक्त होताना दिसत आहे.
यावेळी सरपंच सुरेखा पारठे, मंडळ अधिकारी सुनील मोरे, खांब सजा तळाठी रामेश्वर काळे, माजी सरपंच रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे, मनोज शिर्के, उपसरपंच योगेश धामणसे, संजय भिसे, योगेश टवळे, दत्ता वातेरे, चंद्रकांत जाधव, पांडुरंग खामकर, किसन सानप, मारूती सावरकर, सुरेश पारठे, मारूती चितळकर, सुरेश भोसले, गणेश आमणकर, सदानंद जाधव, चंद्रकांत भोसले, दिलिप मोहिते, दत्ताराम चितळकर, जितेश पारठे, काशिनाथ वातेरे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते