बचत गटांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन

| नेरळ । वार्ताहर ।

कर्जत पंचायत समिती आणि तालुका बचत गट समनव्य समिती यांच्या माध्यमातून कडाव आणि नेरळ येथे महिला स्वयंसहाय्यता बचत गट यांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरले होते. तालुक्यातील 61 बचत गटांच्या वतीने स्टॉल लावण्यात आले होते. दोन दिवस प्रदर्शन आणि विक्री केंद्र सुरू केले होते. नेरळ येथील बापूराव धारप सभागृह येथील महिला बचत गटांच्या या प्रदर्शनाचे उद्घाटन तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी आणि प्रशासक चंद्रकांत साबळे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी माजी आ. पंडित पाटील तालुका शेकापचे चिटणीस श्रीराम राणे, उषा पारधी, ललिता तेलवणे, उज्वला भोसले आणि बचत गटांच्या सीआरपी प्रतिनिधी उपस्थित होते. नेरळ येथील प्रदर्शनात तब्बल 46, तर कडाव येथील बालदिगांबर मंदिरात आयोजित केलेल्या प्रदर्शनात 16 स्टॉल लावण्यात आले होते.

Exit mobile version