अलिबाग मध्ये तिकीटांचे प्रदर्शन

प्रशांत नाईक यांच्या हस्ते उद्घाटन
। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबााग पोस्ट ऑफिस येथे बुधवार दि. 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 च्या दरम्यान नॅशनल पोस्ट वीक उपक्रमाअंतर्गत डाक तिकीट दिन साजरा केला गेला. यावेळी विविध तिकीटांचे प्रदर्शन मांडण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अलिबाग नगरसेवक अ‍ॅड. गौतम पाटील तसेच पोस्ट ऑफिस कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version