शालेय साहित्य महागल्याने पालकांच्या खिशावर भार

। पेण । वार्ताहर ।
नियमितपणे शैक्षणिक वर्ष जूनच्या दुसर्‍या आठवडयात सुरु होत आहे. त्यामुळे शालेय वस्तुंनी बाजारपेठा सजल्या आहेत पण यंदा कागदाचे भाव वाढल्याने शिक्षण साहित्यात 30 ते 40 टक्के वाढ झाल्याने पालकांचा खिसा मात्र हलका होणार आहे. बाजारात नवनवीत प्रकारच्या वह्यांसह विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहेत, कार्टून, सुपरहिरो, खेळाडू, निसर्गरम्य चित्र, फुले, पक्षी, प्राणी या छायाचित्रांसह बहुरंगी वह्यांना मुलांची प्रत्येकवर्षी अधिक पसंती असते. गेल्यावर्षीपेक्षा यंदा शैक्षणिक साहित्यात दरवाढ झाली आहे.

ग्रामीण भागातील आठवडे बाजारामध्ये शैक्षणिक साहित्य विक्रीस असून, पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विक्रीत विविध कंपन्यांची रस्सीखेच असून दर्जेदार साहित्यास ग्राहक आकर्षित होत असल्याचं चित्र बाजारात पाहायला मिळत आहे. नोटबुक, कंपासपेटी, नोट पॅड, लहान मुलांना वापरात असलेली पाटी, पेन, पेन्सील, दप्तर, प्लास्टिक टिफिन, वॉटरबॅग, अंकलिपी या वस्तूंना वाढती मागणी असल्याचे व्यापारी सांगतात. जरी शाळेत पुस्तके मोफत मिळणार असली तरी वह्यांचे नानाविविध प्रकार बाजारात आले आहेत. बदलत्या काळानुसार मुलांना आवडणार्‍या वस्तू देखील महाग झाल्या असल्याची माहिती स्टेशनरी व्यावसायिक भगवानदास शहा स्टेनशनरीचे मालक जितेंद्र शहा यांनी दिली.

शालेय साहित्याचे असे आहेत दर (डझनानुसार)
100 पेजेस वह्या 132 रू ते 216 रू
200 पेजेस वह्या 216 रू ते 360 रू
लॉग बुक 100 पेजेस 216रू ते 300 रू
लॉग बुक 200 पेजेस 240 रू ते 400 रू
इतर साहित्य
ए फोर साईज 300 रू ते 800 रू
कंपासपेटी 50 रू ते 300
प्लास्टिक टिफिन 30 रू ते 200 रू
वॉटरबॅग 40 रू ते 400 रू
दप्तर (सॅक) 200 रू ते 900 रू
पेन्सील बॉक्स 25 रू ते 200 रू
खोडरबर 3 रू ते 10 रू
बॉलपेन 2 रू ते 450 रू
शाईपेन 30 रू ते 200 रू
पॉईंट पेन 7 रू ते 80 रू

Exit mobile version