मुंबईत प्रायोगिक तत्वावरील कबड्डी स्पर्धा

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई शहर कबड्डी असो.च्या वतीने 14 वर्षांखालील मुलामुलींकरिता प्रायोगिक तत्वावरील कबड्डी स्पर्धा 10 ते 15 मे 2923 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. वरळी गावातील गोलफादेवी सेवा मंडळाच्या सहकार्याने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभाग घेणार्‍या संघातील खेळाडूंचे वजन 45 किलो च्या आत आणि जन्मतारीख 1 मे 2009 किंवा त्यानंतरची असावी. जन्मतारखेची सत्यता पडताळण्याकरिता प्रत्येक खेळाडूंनी आधार कार्डची सत्यप्रत व जन्मतारखेचा दाखल किंवा शाळेचे ओळख पत्र सोबत असणे गरजेचे आहे. अशा प्रकारे फाईल तयार करून ती मुंबई शहर कबड्डी असो. च्या कार्यालयात 8 मे पर्यंत जमा करणे गरजेचे आहे. शालेयस्तरावरील मुलामुलींना प्रोत्साहन देण्याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. तरी संघटनेला संलग्न असलेल्या जास्तीतजास्त संघांनी या स्पर्धेत सहभागी होऊन सहकार्य करावे. असे आव्हान या पत्रकाद्वारे मुंबई शहर कबड्डी असो.चे सचिव विश्‍वास मोरे यांनी प्रसारमाध्यमा मार्फत सर्व संस्थाना केले आहे.

Exit mobile version