। नागोठणे । वार्ताहर।
रोहा तालुका मेडिकल चॅरिटेबल असोसिएशनची तिसरे वैद्यकीय शिक्षण शिबीर नुकतेच नागोठण्यातील कामत रिसॉर्टमध्ये उत्साहात संपन्न झाले. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित डॉक्टरांना मोलाचे मार्गदर्शन केले. या वैद्यकीय शिक्षण शिबिरात नागोठणे, कोलाड, रोहा, तळा, पाली, पेडली, परळी व रिलायन्स टाऊनशिप येथील डॉक्टरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या कार्याक्रामाच्या निमित्ताने नागोठणे रिलायन्स कंपनीचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. उद्धव कुमार यांचा रोहा तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने सपत्नीक सत्कार असो.चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र धात्रक यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आदेश पाथरे, सचिव डॉ. राजेंद्र शिंदे, नवी मुंबई येथील न्यूरोसायक्रटीक डॉ. राहुल भातांबरे, रोहा तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र धात्रक, माजी अध्यक्ष डॉ. सुनिल पाटील, नागोठणे येथील ज्येष्ठ डॉ.जी. एस. कोकणे, डॉ. रोहिदास शेळके, डॉ. अन्वर हाफीज, नागोठण्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, असो.चे सचिव डॉ. संकेत म्हात्रे, डॉ. पुरोषोत्तम भोईर, डॉ. अभिषेक शहासने, डॉ. नरेश सोष्टे, डॉ. चिन्मय ओक, डॉ. रुपेश होडबे, डॉ. विनोद गांधी, डॉ. तेजकुमार अपणकर, डॉ. अपुर्व क्षीरसागर , डॉ. प्राजक्ता शहासने आदींसह जिल्हा असोसिएशनचे व तालुका असोसिएशनचे डॉक्टर बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन रोहा तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने सीसीएमपी कोर्स पास झालेल्या रोहा, सुधागड व महाड तालुक्यातील डॉक्टरांचा विशेष सत्कार करण्यात आला.