सुपारी फोडताना स्फोट

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

माणगाव खोर्‍यातील शेतकरी आपल्या शेतात चार कापण्यासाठी गेले होते. यावेळी चार कापत असताना त्यांना त्या ठिकाणी सुपारी सदृश्य एक वस्तू सापडली. त्यांनी ती सुपारी समजून घरी आणली. घरी आणल्यावर ती सुपारी फोडण्याच्या धारदार हत्याराने फोडत असताना अचानक त्याचा स्फोट झाला. यात शेतकर्‍याच्या हाताला दुखापत झाली असून वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत उपचार करण्यात आले आहेत.

दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा गावठी बॉम्ब सदृश्य स्फोटक पदार्थ असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारचे गावठी बॉम्ब जंगल भागात वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी वापरले जातात. मात्र, या गावठी बॉम्ब सदृश्य स्फोटक पदार्थामुळे जंगली प्राण्याऐवजी शेतकरीच जखमी झाला आहे. ही स्फोटक वस्तू शेतात नेमके आली कशी, याबाबत कुडाळ पोलिस तपास करत आहेत.

Exit mobile version