रसायनी | वार्ताहर |
आपटा गावाच्या हद्दीत पाठारे फार्महाऊसच्या पाठीमागील बाजूस एक किलोमीटर अंतरावर डोंगराळ व जंगल भागात वेगवेगळ्या ठिकाणी अंदाजे शंभर मीटर अंतरावर तीन गावठी पेरुन ठेवल्याने परिसरात खळबळ उडाली.
याबाबत नागरिकांनी रसायनी पोलीस ठाण्यात कळवले असता तात्काळ पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर व त्यांच्या पथकाने गावठी बॉम्ब शोधून काढले व त्याबाबत पडताळणीसाठी पाठविण्यात आले. अज्ञात इसमांनी शिकारी करिता तीन गावठी बॉम्ब पेरून ठेवले होते. बेकायदेशीररित्या जंगली प्राणी व मानवी जीवितास धोका होण्याचा शक्यता होती. ठिकाणी स्फोट घडवून आणण्याच्या हेतूने अज्ञात इसमाने गावठी बॉम्ब पेरून ठेवल्याचे पोलिसांना दिसून आले.
याबाबत रसायनी पोलीस ठाण्यामध्ये या अज्ञात व्यक्ती विरोधात भादवि कलम 286 सह भारताचा स्फोटक पदार्थाचा अधिनियम 1908 चे कलम 4 अन्वये दाखल करण्यात आला.