| पनवेल | प्रतिनिधी |
परिवहन विभागामार्फत वाहनांना हाय सिक्युरीटी नंबरप्लेट बसविण्याकरिता मुंबई परिवहन आयुक्त कार्यालयाच्या परिपत्रकानुसार दि.30 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पनवेलचे सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश धोटे यांनी केले आहे. वाहनांना हाय सिक्युरीटी नंबर प्लेट बसविणे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करण्यासाठी वाहनांची ओळख पटवणे, नंबरप्लेट मध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी व नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरीटी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कामासाठी परिवहन विभागाने अधिकृत कंपन्याची नेमणूक केली असून, त्यांच्यामार्फतच हाय सिक्युरीटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे. इतर अनधिकृत विक्रेत्यांकडून नंबरप्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये नोंद होणार नाही.
नंबर प्लेट बसविण्याकरिता मुदतवाढ
