हातोडीने मारहाण करून खंडणीची मागणी

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

वाईन शॉपमध्ये चार अनोळखी व्यक्तींनी येऊन हातोडीने आणि लाथाबुक्याने मारहाण केली आणि चाळीस हजार रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी चौघांविरोधात 7 एप्रिल रोजी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

राज रजनी हा तळोजा फेज टू येथे राहत असून, त्याचे तळोजा येथे कुणाल वाईन्स या नावाने वाईन शॉप आहे. त्या ठिकाणी बारा लोक काम करतात. एक महिन्यांपूर्वी दोन व्यक्ती आले आणि त्यांच्याकडे पैसे मागितले आणि मारण्याची धमकी दिली. राज यांनी त्यांना पैसे दिले नाही. त्यानंतर सहा एप्रिल रोजी दोन व्यक्तींनी मदय खरेदी केले आणि पैसे देण्यास नकार दिला. यावेळी पैसे का देत नाही असे विचारले असता चाळीस हजार रुपये महिन्याला द्या, त्यातून हे पैसे कापून घ्या असे सांगितले. मी तुम्हाला पैसे देणार नाही असे राज बोलले असता त्यांनी शिवीगाळ केली आणि धमकी दिली. त्यानंतर ते तिथून निघून गेले. थोड्या वेळाने चार व्यक्ती दुकानाच्या काउंटरच्या आत आले आणि पाया पड, व्हिडिओ काढ असे बोलून शिवीगाळ केली. आणि शिवकुमार याला मारहाण केली. तसेच हातोडीने दोघांना मारहाण केली. पुढच्या महिन्यात पैसे घ्यायला येऊ दिलं नाही तर पुन्हा मारणार धमकी देऊन ते निघून गेले.

Exit mobile version