लायन्स क्लबच्यावतीने डोळे तपासणी शिबीर

। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे लायन्स क्लब व नवीन पनवेल येथील आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि.15) मोफत डोळे तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागोठणे शहर व विभागातील सुमारे 227 नागरिकांनी या शिबिरात सहभागी होत उस्फुर्त प्रतिसाद दिला. यातील 82 रुग्णांची झुनझुनवाला हॉस्पीटलमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ.अनिल गिते यांनी दिली.

या शिबिराचे उद्घाटन लायन्स क्लबचे प्रकाश जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी किशोर जैन, नुरुद्दीन रोहावाला, डॉ. अनिल गिते, यशवंत चित्रे, विवेक सुभेकर, विलास चौलकर, संतोष शहासने, पांडूरंग शिंदे, सुजाता जवके, दौलत मोदी, दिपक गायकवाड, सुनिल कुथे, विवेक करडे, श्‍वेता सुभेकर, प्रती महागावकर, दिपक लोणारी, अजिंक्य कोते, अजित काळे, सुशिल राजिवले, दिपिका गायकवाड, शिबिर समन्वयक प्रकाश पाटील व त्यांची टीम आदी उपस्थित होते.

Exit mobile version