लायन्स क्लबतर्फे नेत्र तपासणी

| अलिबाग | प्रतिनिधी |

लायन्स क्लब पोयनाड आयोजित, श्रीदत्त आदिवासी वाडी, तीनवीरा आणि लायन्स हेल्थ फाऊंडेशन, चोंढी यांच्या सहकार्याने (दि.27) फेब्रुवारी रोजी तीनवीरा आदिवासी वाडीवरील मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 150 नेत्र रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. याप्रसंगी लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष प्रमोद राऊत, प्रदीप सिनकर, विकास पाटील, प्रमोद पाटील, महेंद्र पाटील, कल्पना राऊत, महेश गुरव यांची उपस्थिती होती. या शिबिरासाठी लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या डोळ्यांच्या हॉस्पिटलच्या सीइओ डॉ. शुभदा कुरतडकर, डॉ. प्रतीक कणसे, प्रचिती किणी, सिद्धी पाटील, श्रावणी मसूरकर, दीपिका पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हे शिबीर यशस्वी करण्याकरता राजू प्रभाळे यांनी खूप मेहनत घेतली.

Exit mobile version