| माणगाव | वार्ताहर |
माणगावात शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक विजयशेठ चॅरिटेबल ट्रस्ट माणगावतर्फे बुधवार (दि. 10) वृत्तपत्र विक्रेते नितीन मेथा यांचे हॉल जुने एसटी स्टॅन्ड जवळ माणगाव याठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शंकरा आय हॉस्पिटलचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.प्रकाश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी 82 रुग्णांची तपासणी करून 47 नेत्ररुग्णांना पनवेल येथे नेऊन त्यांच्यावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शिबिराला माणगाव, महाड, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, पोलादपूर, रोहा आदी तालुक्यांतील जवळपास गेल्या दिड वर्षांपासून शिबिरात 1350 हुन अधिक रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली असून गोरगरीब जनतेला दृष्टी मिळाल्याचा आनंद हा सुखावणारा आहे. सदर शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विजय मेथा, सुप्रिया शिंदे, तनुजा हेमंत मेथा, छाया मेथा, विधिता मेथा, मनीष मेथा यांच्यासह शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेलचे टीम व्यवस्थापक डॉ. प्रकाश पाटील व त्यांचे सहकारी यांनी सहकार्य करीत विशेष परिश्रम घेतले.