नेणवली शाळेत नेत्रतपासणी शिबीर

| पाली /बेणसे | वार्ताहर |

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत नेणवली शाळेत दि.1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 मध्ये या अभियानास सुरुवात झाली आहे. त्यानुसार शनिवार (दि.20 ) रोजी लक्ष्मी आय सेंटर पालीतर्फे नेणवली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मोफत डोळे तपासणी शिबीर संपन्न झाले. यासाठी लक्ष्मी आय सेंटरचे तज्ज्ञ डॉक्टर नागेश देशपांडे उपस्थित राहून त्यांनी नेणवली सारख्या दुर्गम व ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी केली. यावेळी नेणवली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किसन कोंडे, उपसरपंच शांताराम कोंडे, शिक्षणतज्ज्ञ महेंद्र पडवळ, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके, गणपत वरगडे उपस्थित होते.

Exit mobile version