| पाली/बेणसे | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषद शाळा नेणवली सुधागड करिता रोटरी क्लब ऑफ पनवेल सिंफनीकडून ई-लर्निंग अंतर्गत स्मार्ट टीव्ही, सोबत इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंत कोम्पकीनचे मराठी व इंग्रजी माध्यम अभ्यासक्रम भेट देण्यात आले आहे. यामुळे आता येथील विर्द्यार्थ्यांना हसत-खळत तंत्रज्ञानाच्या सहायाने शिक्षण घेता येणार आहे.
रोटरीला लागणारी दहा हजार लोकवर्गणी दुबई येथील अरिफ पटेल यांच्याकडून प्राप्त झाली. उर्वरित मदत रोटरीमार्फत मिळाल्यामुळे हा संच नेणवली शाळेस मिळाला आहे. सदर ई-लर्निंग संच प्रदान व उदघाटन सोहळा ग्रामपंचायत उपसरपंच शांताराम कोंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किसन कोंडे, शिक्षणतज्ज्ञ महेंद्र पडवळ व सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास आतोणे केंद्रप्रमुख कल्पना पाटील व रोटरीचे क्लब ट्रेनर शिवाजीराव पाटील, सहायक गव्हर्नर राममोहन शिंदे, संचालक, युथ सर्विस विक्रम धुमाळ या सर्व मान्यवरांच्या हस्ते ई-लर्निंग संच शाळेस प्रदान करण्यात आले. यावेळी अरिफ पटेल यांचा व्हॉइस मेसेज संदेश एकवण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र अंबीके, विषय शिक्षक रवींद्र हंबीर व उपशिक्षक गणपत वरगडे उपस्थित होते.