लायन्स क्लबतर्फे गरजू पेशंटसाठी सुविधा

। खारेपाट । वार्ताहर ।

लायन्स क्लब अलिबाग डायमंडतर्फे कार्लेखिंड प्रयास हॉस्पिटल येथे रूग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी किंवा ऑपरेशन झालेल्या रुग्णांना भाडेतत्त्वावर घरी घेउन जाण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर, फाऊलर्स बेड, एअर बेड, व्हील चेअर, वॉकर अशा अनेक उपकरणांचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, प्रयास हॉस्पिटल येथेच माफक दरात नेत्रचिकित्सा सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमांना लायन्स हेल्थ फाउंडेशन, लायन विजय गणात्रा ला. नितीन आधिकरी, ला. चित्रा लोंढे व ला. प्रियदर्शिनी पाटील यांनी आर्थिक साहाय्य केले आहे. या तीनही उपक्रमांचे अनावरण ला. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, ला. एन. आर. परमेश्‍वरन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून प्रथम प्रांतपाल ला. संजीव सूर्यवंशी, द्वितीय प्रांतपाल ला. प्रवीण सरनाईक व माजी प्रांतपाल ला. अनिल जाधव, ग्याट कोर्डीनेटर ला. अनिल म्हात्रे, रिजन चेअरमन ला. विजय वनगे, झोन चेअरमन ला. प्रीतम गांधी हे उपस्थित होते.

Exit mobile version