अलिबाग पोलिसांची कारवाई
| रायगड । प्रतिनिधी ।
अलिबाग मयेकर आळी येथे सुमारे सहा लाख रुपयांच्या बनावट नोटांचे घबाड अलिबाग पोलिसांनी हस्तगत केले आहे. भूषण पतंगे या तरुणांच्या घरातून या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई अलिबाग पोलिसांनी केली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
