। मुंबई । प्रतिनिधी ।
प्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे रविवारी (दि. 15) निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उस्ताद झाकीर हुसेन गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराच्या आजाराचा सामना करत होते. मात्र, रविवारी 15 डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान झाकीर हुसैन यांची प्राणज्योत मालवली.