। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबागचे नगराध्यक्ष डॉ प्रशांत नाईक यांना नेल्सन मंडेला नोबेल पीस अवार्ड पुरस्कार व मानद डॅाक्टरेट मिळाल्याबद्दल अलिबाग, पेण व ठाणे दाउदी बोहरा समाज यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेकाप सभापती अजय झुंजारराव, मानसी म्हात्रे, प्रदीप नाईक, नगरसेवक अनिल चोपडा, गौतम पाटील, महेश शिंदे, सुरक्षा शहा तसेच ठाणे व पेण येथील दाउदी बोहरा समाजाचे सदस्य व अलिबाग बोहरा समाजाचे मुस्तानसीर एम. कांटावाला, अलिअसगर एम. कांटावला, झाकीर कांचवाला, हुसैन कांचवाला, सैफुद्दीन चिंत्तलवाला, युसूफ लाड साहेब, शब्बिर लालखान, कोकण टिंबर अँण्ड प्लायवूड मार्ट, हुसेन ग्लास ट्रेडर्स, लकी बॅग तसेच समाजातील सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ व तरूण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. या कार्यक्रमाच्यावेळी मुस्तानसीर एम. कांटावाला यांनी प्रशांत नाईक यांचे छोट्याशा भाषणातून कौतुक केले. तसेच पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.