भावनिक वातावरणात शिक्षकांना निरोप

| खरोशी | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील वाशी ग्रामपंचायत हद्दीतील सरेभाग येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील माजी मुख्याध्यापक मनोज थळे, मीनाक्षी जांभळे, विलास पाटील या शिक्षकांचा निरोप समारंभ अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला.

या सर्व शिक्षकांचे खूप मोठे योगदान सारेभाग शाळेला लाभले. शिक्षकांच्या प्रामाणिक प्रयत्न आणि अथक मेहनतीमुळे अतिशय दुरावस्थेतील शाळेचे रूपडे बदलले. या शाळेची सुसज्ज इमारत, क्रीडांगण, रंगमंच, स्वच्छतागृह, संगणक सुविधा अशा सर्व सुविधा शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी निर्माण केल्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गणवेश, टी-शर्ट, दप्तर व इतर शालोपयोगी वस्तू भेट दिल्या. तसेच रोख रक्कम 10 हजार रुपये देणगी स्वरूपात दिली. निरोप घेताना विद्यार्थ्यांनी शाळेत शिकविलेल्या कलाकृती बनवून शिक्षकांना भेट दिल्या. त्यामुळे आमची मेहनत सफल झाली, असे उद्गार शिक्षिका मीनाक्षी जांभळे यांनी व्यक्त केले. शाळेसोबत कायम ऋणानुबंध राहतील, असे मनोज थळे गुरूजी व विलास पाटील गुरुजींनी आपल्या मनोगतात सांगितले.

Exit mobile version