तळ्यात कृषी अधिकाऱ्यांचा शेतभेट दौरा

| तळा | प्रतिनिधी |

तळा तालुक्यात उपविभागीय कृषी अधिकारी माणगाव शुभम बोराडे, तालुका कृषी अधिकारी तळा कांबळे साहेब व मंडळ कृषी अधिकारी तळा घालमे यांनी तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या प्रात्यक्षिकांची पाहणी केली. मौजे खांबिवली येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत स्थापन झालेल्या जय हनुमान सेंद्रिय शेतकरी उत्पादक गटात भेट देऊन गटातील शेतकऱ्यांनी तयार केलेल्या सेंद्रिय निविष्ठांची तसेच सेंद्रिय निविष्ठांचा वापर केलेल्या पिकांची प्रात्यक्षिके पाहिली. यानंतर मौजे रोवळा येथे महिला बचत गटाने उभारलेल्या नाचणी पीक प्रात्यक्षिकास भेट देऊन शेतकऱ्यांना नाचणी पिकाविषयी मार्गदर्शन केले. तसेच विठोबा घाडगे यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण तृणधान्य उपअभियान अंतर्गत घेतलेल्या सलग तुर पिकाची पाहणी करण्यात आली. मौजे ताम्हाणे तर्फे तळे येथे विलास रामचंद्र धाडवे यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण तृणधान्य अभियानांतर्गत चार सूत्री पद्धतीने घेतलेल्या भात लागवड प्रात्यक्षिकास भेट देऊन कृषी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आत्मा अंतर्गत भात पीक प्रात्यक्षिकांची ही पाहणी करण्यात आली. या दौऱ्यात सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकारी गोविंद पाशिमे तसेच सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा सचिन लोखंडे उपस्थित होते.

Exit mobile version