विज पडून शेतकरी गंभीर जखमी

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील खंडस गावातील हिरामण मारूती ऐनकर यांच्या अंगावर मंगळवारी (दि.5) संध्याकाळी वीज पडली. यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत.
खांडस गावातील हिरामण ऐनकर आणि त्याचा भाऊ पंढरीनाथ ऐनकर हे गावापासून 100 मीटर अंतरावरील आपल्या शेतात गुरे घेऊन गेले होते. सायंकाळी त्या भागात विजांच्या कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह पाऊस सुरू झाला. त्यावेळी वीज आकाशातून येत ऐनकर यांच्या अंगावर आली.त्यात आगीचे लोळ हिरामण मारुती ऐनकर यांच्या अंगावर पडले आणि त्यात ते भाजले गेले. त्यांना तात्काळ खांडस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तर खांडस गावात असलेल्या तेथील विठ्ठल रूख्मिणी मंदिरावर वीज कोसळ्यामुळे मंदिराचे प्रचंड नुसकान झाले. यावेळी कोणताही जीवीतहानी झालेली नाही.

Exit mobile version