। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील खांडस ग्रुपग्रामपंचायत मधील रिक्त झालेल्या उपसरपंचपदी किशोर पोसलेले यांची बिनविरोध निवड झाली आहे. खांडस ग्रामपंचायतचे उपसरपंच लहू ऐनकर यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पदासाठी निवडणूक विशेष सभा बोलावून घेण्यात आली.
थेट सरपंच ताई पादीर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीसाठी उपसरपंच पदाकरिता किशोर पोसाटे यांचा अर्ज दाखल झाला होता.या निवडणुकीत निर्धारित वेळेनंतर किशोर पोसाटे यांची खांडस ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यावेळी थेट सरपंच आणि पीठासीन अधिकारी ताई पादीर यांना ग्रामविकास अधिकारी बाळकृष्ण मोरे यांनी सहकार्य केले. त्यावेळी नवनिर्वाचित उप सरपंच किशोर पोसाटे यांचे अभिमानदं करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख उत्तम कोळंबे,तालुका संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर यांच्यासह तालुका सह संपर्क प्रमुख बाजीराव दळवी,माजी सरपंच विलास माळी, निलेश थोरवे, लक्ष्मण पोसटे, असीम बूबेरे, रवींद्र ऐनकर, संतोष पाटील, माजी सरपंच मंगल ऐनकर, गोपीनाथ भोईर, बाळू ऐनकर, दाजी ऐनकर, सीताराम बांगरे, दीपक ऐनकर, भरत ऐनकर, शिवाजी ऐनकर, सुरेश ऐनकर, बंदू पोसाटे, दुंदा पोसाटे, महादेव ऐनकर आदी शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.