| कोर्लई | प्रतिनिधी |
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारल्याने मुरूडमधील शेतकरी व बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली असून, ते हवालदिल झाले आहेत. मागील चार दिवस मुरुडमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यात सर्वाधिक 362 मि.मी.पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे येथील शेतकरी व बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, गुरुवारी पडलेल्या पावसानंतर शुक्रवार आणि शनिवारी पावसाने दडी मारल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम भात पिकाच्या राबावर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुरूडमधील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
मुरूडमधील शेतकरी-बागायतदार हवालदिल
