पिके वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची शक्कल

। पाताळगंगा । वार्ताहर ।
गेले आठ दिवसांपासून परिसरात पाऊस धुमाकूळ घालत असल्यामुळे शेतकर्‍यांना तोंडचे पाणी पळाले आहे. उत्तरा नक्षत्रामुळे भातशेती अडवी झाली. त्याचबरोबर हस्त नक्षत्र सुरु झाल्यापासून गेले दिवस या पावसाने आपले रुप दाखविले. यामुळे अगोदरच भातशेती अडवी झाली असून त्यातच पावसामुळे भातशेती कुजली आहे. उन्हाचा प्रखर वाढत असतांना भाताच्या लोंब्यापासून दाणा अलग होत असल्यामुळे शेतकर्‍यांनी शेतातील पिके वाचविण्यासाठी नामी शक्कल काढून काठीच्या साहाय्याने पडलेली भात शेती केली असल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे. परतीच्या पावसाने भात शेतीचे नुकसान होवू नये शिवाय आपल्याला जास्त प्रमाणात भाताची कणसे मिळावी या दृष्टीकोणातून शेतावरील असलेल्या झाडाच्या फाद्याची छोटी छोटी लाकडे घेवून ती जमिनीत रोवून ती भाताची कणसे एकत्र करून या रोवलेल्या लाकडांना बांधण्यात शेतकरी वर्गांनी कंबर कसली आहे. जेणेकरून लोंब्याना आलेला भात कणीस खराब होवू नये शिवाय शेतामध्ये खूप पाणी जमा झाल्यामुळे पेंढा सुद्धा खराब होवू शकतो. यामुळे गुरांच्या चार्‍याची मोठी समस्या निर्माण होवू शकते. यामुळे भात शेती समवेत गुरांच्या चार्‍याचा प्रश्‍न मार्गी लावणे हे सुद्धा विचारांत घेवून शेतकरी आपली पिके आणी पेंढा वाचविण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवित आहे.

Exit mobile version