| पाताळगंगा | वार्ताहर |
पावसाचे तुरळक आगमन गेले तीन चार दिवस होत असल्यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पावसाने आपले अस्तित्व दाखविल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकर्यांनी आपल्या जवळ असलेल्या बैलाच्या साह्याने पेरणी करण्यासाठी सुरुवात केली आहे.
पावसाळ्याचा हंगाम सुरु होत असल्याने शेतकरी पेरणीच्या जोरदार तयारीला लागलेला असल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी आपणांस पहावयास मिळत आहे. परंतु यावर्षी पावसाचे आगमन कसे होणार या विचाराने हवामान खाते, पंचागकारांनी भविष्य वर्तविलेले असल्यामुळे शेतकर्यांनी पेरणीस सुरुवात केली आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या पिकांचे अल्प प्रमाणात नुकसान झाले होते. तर काहीना मोठे नुकसानं सहन करावे लागले. ते ह्या वर्षी होवू नये, या साठी वरुण राजावर विश्वास ठेवून पेरणी करण्यास सुरुवात झाली आहे. शेती शिवाय पर्याय नसल्यामुळे शेतकरी वर्ग शेती करण्यासाठी सज्य झाला आहे. ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असताना,या पावसामुळे गुरांसाठी चार्यांचा प्रश्न सुटणार असून, मुबलक पाणी मिळणार याकडे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. शेतकरी त्या वरून राजाच्या सरी पाहण्यासाठी उस्तुक झाले आहेत. म्हणूनच शेतकर्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे, असल्याचे स्थानिक शेतकर्यांनी सांगितले.
पावसाचे तुरळक अगमन झाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गाने पेरणी करण्यास सुरुवात केली असून काही ठिकाणी पेरणी सुरु असून काही ठिकाणी शेतकरी वर्ग पावसाच्या पाण्याच्या प्रतिक्षेत आहे. पेरणी केल्यावर पाऊस पडला नाही तर राब नष्ट होत असतात म्हणून तालुक्याच्या ठिकाणी तुरळक भात पेरणीती कामे सुरु झाली आहेत.
अतिष म्हात्रे,
शेतकरी