शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित

शासनाच्या चुकीचा फटका शेतकऱ्यांना

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

कोलाड परिसरातील शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित आहेत. दररोज फेऱ्या मारुनही शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा न झाल्यामुळे येथील शेतकरी तलाठी कार्यालयात फेऱ्या मारून त्रस्त झाले आहेत.

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी भरलेल्या फॉर्मवर शेतकऱ्यांचे नाव, आधारकार्ड नंबर, बँक खाते नंबर अचूक असला तरच याचा लाभ घेता येतो. व याची ािज्ञळीरप.ळप वर सीएससी सेंटरवर जाऊन केवाईसी केली तर या योजनेचा लाभ घेता येते. परंतु, ग्रामीण भागातील शेतकरी अशिक्षित असल्यामुळे याची त्यांना माहिती नसल्याने अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहात आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून 6000 रुपये चार महिन्यांनी तीन हप्त्यात जमा होतात; परंतु कोलाड परिसरातील असंख्य शेतकऱ्यांच्या खात्यात चार हप्ते जमा झाले नाही. याचे कारण वेगळेच आहे. या पीएम किसान यादीत तर वरसगाव येथील गावाचे नाव वासगाव असे झाल्यामुळे येथील बलराज कुर्ले, विजय शिंदे, रोहिदास शिंदे, सुभाष मालुसरे, राजीवले, सानप या शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे चार हप्ते जमा झाले नाही, याला जबादार कोण? येथील शेतकरी फेऱ्या मारून मेटाकुटीला आले असून, शासनाच्या चुकीमुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

Exit mobile version