भादाणेतील शेतकर्‍यांना घरपोच पावती

‘माझी पॉलिसी, माझ्या हातात’ उपक्रमाचा शुभारंभ

जिल्ह्यात 7871 शेतकर्‍यांनी उरविला विमा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

केंद्र शासनामार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 योजनेतील शेतकर्‍यांना त्यांची विम्याची पावती घरपोच देण्यात येणार आहे. उपक्रमाची सुरुवात तालुक्यातील भादाणे गावातील शेतकर्‍यांना विम्याची पावती देऊन करण्यात आली. हा उपक्रम अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडमार्फत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

तत्पूर्वी, या उपक्रमाचे उद्घाटन 8 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर या यावेळी आ. महेश बालदी, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2022 अंतर्गत भात व नाचणी ही दोन पिके अधिसूचित आहेत. भातपिकासाठी विमा हप्त रक्म 1035.20 रुपये प्रति हेक्टर असून, विमा संरक्षित रक्कम 51,760 रुपये प्रति हेक्टर एवढी आहे. तर, नाचणी पिकासाठी विमा हप्ता रक्कम 400 रुपये प्रति हेक्टर असून, विमा संरक्षित रक्कम 20,000 रुपये प्रति हेक्अर एवढी आहे. खरीप हंगाम 2022 जिल्ह्यामध्ये एकूण 7871 शेतकर्‍यांनी पीक विमा उतरविला आहे. यापैकी बँकेमार्फत विमा पॉलिसी घेतलेल्या कर्जदार 2283 शेतकर्‍यांना विमा पॉलिसी वाटप करण्यात येत आहे.

हा उपक्रम अलिबाग तालुक्यातील भादाणे गावात शुक्रवार, 9 सप्टेंबर रोजी घेण्यात आला. यावेळी कृषी उपसंचालक दत्तात्रेय काळभोर, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखडे, तालुका कृषी अधिकारी हर्षाली सावंत, कृषी पर्यवेक्षक श्री. सूर्यवंशी, गावचे उपसरपंच अनिल चव्हाण, अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा समन्वयक शरद कबाडे, तालुका समन्वयक वैभव घरत आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत विमा पॉलिसीधारक शेतकर्‍यांना पॉलिसी देऊन पीक विमा पाठशाळा अंतर्गत विमाविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

Exit mobile version