रामकी कंपनीच्या प्रकल्पाने शेतकर्‍यांचे नुकसान

| नागपूर | प्रतिनिधी |
पनवेल महानगर पालिका हद्दीतील रामकी कंपनीच्या इंडस्ट्रीयल हझार्ड्स वेस्ट वर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. त्याबाबत सरकारने कोणती कारवाई केली असा संतप्त सवाल शेकाप आमदार बाळाराम पाटील यांनी विधान परिषदेत सरकारला विचारला.

ते पुढे म्हणाले की सिद्दी करवले गावासह आजुबाजू च्या परिसरात यामुळे हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण होत आहे. तसेच पावसाळयात सदर प्रकल्पातून वाहून येणार्या प्रदूषित पाण्या मुळे आजुबाजुच्या शेतकर्यांची शेत पिके खराब होऊन शेतकर्यांचे नुकसान होत आह. याबाबत सरकारने नुकसान ग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत काय कार्यवाही केली आहे असा सवाल ही सरकारला विचारला आहे.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की वस्तुस्थिति अंशता खरी आहे . महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ह्या प्रकल्पा मध्ये वार्षिक 1, 20,000/- मेट्रिक टन इतक्या क्षमतेस भुभराव करण्यास व वार्षिक 30 ,000 मेट्रिक टन इतक्या क्षमतेच्या भस्मीकरण करण्यास सशर्त संमती पत्र प्रदान केले असून त्याची वैधता 28/2/2025 पर्यन्त आहे.

या प्रकल्पाच्या अनुशंगाने प्राप्त तक्रारीस अनुसरुन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिनांक 6/8/2022 रोजी केलेल्या पाहणी मध्ये रामकी प्रकल्पास प्रदान केलेल्या समंती पत्रामधील काही अटी व शर्तीचे पालन करत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे सदर प्रकल्पास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिनांक 11/8/2022 रोजी कारणे दाखवा नोटिस व दिनांक 11/11/ 2022 रोजी प्रस्तावित आदेश दिले आहेत. सदर आदेशा नुसार प्रकल्पाची महराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा असलेली रुपये 05.00 लक्ष बैंक हमी जमा करण्याचे आदेश संबंधित बैंकेस देण्यात आले आहेत. तसेच रुपये 10.00 ल क्ष महराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.असे हि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.

Exit mobile version