। मुंबई । दिलीप जाधव ।
भारतात 1500 टन बांबू पासून तयार झालेली अगरबत्ती वापरली जाते. त्यातील साडेचार चार लाख टन अगरबत्ती चीन आणि मलेशियामधून आयात केली जाते . दापोली कृषी विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी बांबूवर संशोधन केले आहे. सरकारने कोकणातील शेतकर्यांना बांबू शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी दापोली मंडणगडचे आ. योगेश रामदास कदम यांनी विधानसभेत केली.
कोकणातील मच्छिमार बांधवांनी बोटी बांधण्यासाठी कर्ज घेतले आहे. मात्र त्यांना राज्यसरकार आणि केंद्रसरकारकडून मदत मिळत नाही.म्हणून त्यांनी आपल्या घरांवर कर्ज काढले आहे. 5 ते 10 वर्षांपासून डिझेल परतावा मिळत नाही.हर्णे बंदराचा आराखडा तयार आहे. मात्र त्या कामाला सुरुवात होत नाही .त्यामुळे मच्छिमार बांधवांना त्याचा त्रास होत आहे. हर्णे बंदराचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी कदम यांनी केली .
कोकणात चक्री वादळात शेतकर्यांचे,मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यांना आर्थिक भरपाई दिली पाहिजे.तसेच शाळांचे नुकसान झाले आहे . त्या पुन्हा नव्याने बांधाव्यात,डोंगरी भागातल्या शाळात विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असते,शासनाच्या नियमाप्रमाणे 5 टक्यांपेक्षा शाळांमध्ये कमी उपस्थिती असल्यास त्या बंद कराव्यात असा निर्णय आहे त्यावर शासनाने फेर विचार करावा. शाळांमध्ये विजेच्या जोडण्या कराव्यात, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शौचालये बांधली गेली पाहिजेत तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंग्रजी शिक्षण दिले जात नाहीत ते देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी योगेश कदम यांनी विधानसभेत केली.