कृषी संजीवनी पंधरवडा मोहिमेत शेतकरी सभा

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यात चिरनेर गावात ग्रामपंचायतीच्या सभागृहात दिनांक 20 जून रोजी, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्ताने कृषी संजीवनी पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

17 जून ते 1 जुलै या कालावधी दरम्यान कृषी संजीवनी पंधरवडा मोहिमेअंतर्गत शेतकरी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत गुणवत्ता पूर्ण निविष्ठा ओळख, बियाणे, खते, कीटकनाशक याबाबत जनजागृती तसेच, एक रुपयात भात पीक विमा योजना व कृषी विषयक योजनांची सविस्तर माहिती यावेळी कृषी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

परसबाग भाजीपाला मिनी किटचे वाटपदेखील करण्यात आले. यावेळी कृषी पर्यवेक्षक एस. व्ही. लोहकरे, कृषी सहाय्यक एस. जी. घरत, कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील यांनी शेतकरी सभेत माहिती देताना सांगितले की, शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, तसेच शेतीपासून दूर जाणाऱ्या युवकांना शेतीकडे वळविण्यासाठी, त्यांचे गैरसमज दूर करून त्यांना शेतीचे महत्व समजावे हा प्रमुख उद्देश या कृषी संजीवनी पंधरवडा मोहिमेचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version