कोकणातील शेतकरी धीट अन् कणखर- शिवानी जंगम

। खोपोली । प्रतिनिधी ।

कोकणातील माणसं ही कष्टकरी आहेत. भले गरिबीत राहत असले तरी मनाने धीट आणि कणखर आहेत. प्रतिकुल परिस्थितीवर मार्ग काढण्याची ताकद कोकणच्या माणसांमध्ये असल्यामुळेच कधी आत्महत्या करत नसल्याचे प्रतिपादन खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी शेतकर्‍यांच्या सन्मान सोहळ्यात बोलताना केले आहे. कृषी दिनाचे औचित्य साधत स्वामीनी महिला प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्षा कांचन जाधव यांनी वर्षभर शेतात राबणार्‍या अन्नदात्याचा सन्मान सोहळा सोमवारी (दि.1) वावोशी येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम उपस्थित होत्या. यावेळी आ. महेंद्र थोरवे, बाबू पोटे, पंकज पाटील, प्रशांत गोपाळे, श्‍वेता मनवे उपस्थित होते.

Exit mobile version