कॅस्ट्रॉलविरोधात शेतकर्‍यांचे उपोषण

। रसायनी । वार्ताहर ।

कॅस्ट्रोल कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळावी यासाठी पाताळगंगा विभागातील कैरे गावातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांची मुले साखळी उपोषणास बसली आहेत. गोविंद हाडकू पाटील, जगन्नाथ दामाजी पाटील, अनंता नामदेव पाटील यांची कॅस्ट्रोल कंपनीच्या उभारणीत शेतजमीन गेली होती. हे खोदकामापासून या कंपनीत काम करत होते. वारसांना कामावरून कमी करत भविष्यात तुमच्या वारसांना कामावर घेऊ असे आश्‍वासन दिले होते. प्रकल्पग्रस्त मुलांना सुरुवातीपासूनच कंपनीने कामावर घेतले होते मात्र शिक्षण कमी असल्याचे कारण देत अद्यापही वारसांना कामावर घेतले नाही.
वारंवार पत्रव्यवहार विनंत्या करूनही कंपनी कामावर घेण्यास नकार देत आहे. नोकर भरती सुरू असताना बाहेरील तरुणांना सामावून घेतले जात आहे. पण शिक्षण असूनही स्थानिक प्रकल्पग्रस्त यांच्यावर अन्याय होत होता. आम्हाला नोकरीत कायमस्वरूपी कामावर घ्यावे या मागणीसाठी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर साखळी उपोषणास सुरुवात झालेली आहे.

गोविंद हाडकू पाटील, जगन्नाथ दामाजी पाटील, अनंता नामदेव पाटील यांना व्हीआरएस देवून 2003 पासून कंपनीने कामावरून काढून टाकले आहे. त्यांच्या जमिनीवरच कॅस्ट्रोल कंपनी उभी आहे. त्यांच्या मुलांना कामावर कंपनीत घ्यावे असे असतानाही कॅस्ट्रोल कंपनी व्यवस्थापनाचे एच.आर. मॅनेजर टेंबे व जनरल मॅनेजर झा हे जाणून-बुजून याकडे दुर्लक्ष करीत आहेत. साखळी उपोषणाला रसायनी पाताळगंगा परिसरातील सर्व स्थानिक नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

यावेळी माधवी जोशी, माजी आ. बाळाराम पाटील, गजानन माळी, महादेव गडगे, सरपंच गौैरी गडगे, रमेश पाटील, अशोक मुंढे, सागर सुखदरे, कृष्णा पारंगे, प्रमोद राईलकर, नाना म्हात्रे, उत्तम भोईर, बंधू बडेकर, जयवंत पाटील, रामदास पाटील, भगवान पाटील, एम. सी. पाटील, आदींनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

Exit mobile version