प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी नोकरीत घेण्याचे कबूल
बाळाराम पाटील यांच्यासह सर्वपक्षीयांची मध्यस्थी
| रसायनी | वार्ताहर |
शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आ. बाळाराम पाटील यांच्यासह सर्वपक्षीयांच्या मध्यस्थीनंतर अखेर कंपनी व्यवस्थापन नमले असून, त्यांनी प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी कामावर घेण्याचे कबूल केले आहे. श्रमिक संघाच्या कामगार नेत्या श्रुती श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सहा दिवस हे तरुण उपोषणाला बसले होते. दरम्यान, प्रकल्पग्रस्त तरुणांनी कंपनीने आम्हाला अप्रेंटिसशिप दिलेली आहे; परंतु या कॅस्ट्रोल कंपनीसाठी आमची जमीन गेलेली आहे, आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत, आम्हाला कायमस्वरूपी नोकर्या दिल्या पाहिजे, अशी मागणी केली होती; परंतु कंपनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत होते. सदर उपोषणाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता. परंतु, कॅस्ट्रॉल व्यवस्थापन त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत होते. शेवटी सोमवार, दि. 21 ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आ. बाळाराम पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आ. मनोहर भोईर यांच्या यशस्वी आंदोलक तरुणांना कायमस्वरूपी नोकर्या देण्यात येतील, असं कॅस्ट्रॉल कंपनीचे व्यवस्थापन यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर उपोषणकर्ते गोविंद पाटील, जगन्नाथ पाटील व अनंत पाटील यांनी लिंबू सरबत पिऊन उपोषणाची सांगता केली.
तत्पूर्वी, कॅस्ट्रॉल कंपनीच्या व्यवस्थापनाबरोबर झालेल्या दीड तासांच्या चर्चेत बाळाराम पाटील, मनोहर भोईर यांनी प्रकल्पग्रस्त तरुणांची बाजू मांडल्यानंतर प्रशासन वाठणीवर आले व कॅस्ट्रॉल कंपनीच्या व्यवस्थापनाला या तिन्ही मुलांना नोकरी देण्यास भाग पाडले. प्रकल्पग्रस्त उपोषणकर्त्यांना न्याय मिळाल्याने त्यांनी आमरण उपोषण मागे घेतले आणि पाठिंबा देणार्यांचे आभार मानले. यावेळी कामगार नेत्या श्रृती म्हात्रे, माजी आमदार बाळाराम पाटील, मनोहर भोईर, देवेंद्र साटम, माजी जि.प.सदस्य मोतीराम ठोंबरे, सरपंच गौरी गडगे, मनसे नेते जे.पी. पाटील, दिपक कांबळी, शेकाप चिटणीस संदीप पाटील, भाजपा नेते विनोद साबळे, राष्ट्रवादीच्या माधवी जोशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील सोनावळे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सचिन सावंत, कोकणध्यक्ष राजवर्धन सावंत, खालापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा पारंगे, राजेश लाड, जगदीश पवार, देवेंद्र पाटील, विजय मुरकुटे, महादेव गडगे, प्रशांत गायकवाड, रमेश पाटील, प्रकल्पग्रस्त संघटनेचे अशोक मुंढे, सागर सुखदरे, प्रमोद राईलकर, नाना म्हात्रे, उत्तम भोईर, अॅड. जयवंत पाटील, पोलीस पाटील रामदास पाटील, नीलम पाटील, भगवान पाटील, शेकाप नेते एम.सी. पाटील, अनंता जाधव आदींसह अनेक राजकीय, सामजिक नेते व विभागातील कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. कंपन्याकडून स्थानिकांवर अन्याय होत असेल तर सर्वपक्ष एकत्रित येतील, असे मान्यवरांनी बोलताना सांगितले.