रब्बी हंगामसाठी शेतकर्‍याची लगबग

| आगरदांडा | प्रतिनिधी ।

मुरुड तालुक्यात भात कापणी नंतर जमिनीची अंग ओल्यावर प्रामुख्याने वाल पिकाची पेरणी केली जाते. वाल पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामाना सुरुवात करण्यात आली आहे. वाल पेरणीसाठी शेतकरी स्व:कडील वाल स्थानीक जातीचा वापर केला जातो. त्याबरोबर कलींगडचे मोठया प्रमाणावर पिक घेतले जाते. यासाठी अळी करणे, सरी वरंबा करणे इत्यादीची पूर्व मशागतीची कामे चालु आहेत.

वालाची मागणी मोठया प्रमाणात असल्याने शिवाय आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह यी व्यवसायावर होत असल्याने शेककर्‍यांकडून जोडधंदा म्हणून शेतात पीक घेतले जाते. चार महिने हिवाळयाचे असल्याने व थंडीत दवामुळे जमीन होत असल्याने पिकाला त्यांचा मोठया प्रमाणात उपयोग होतो. या पिकांना पाण्याची आवश्कता नसते. या थंडीच्या दवामुळे जमीन ओलसर होते त्या दवामुळे वाल पीक, कलींगड मोठया प्रमाणात पोषक द्रव्य जमिनितुन मिळते. त्यामुळे शेतक-यांना ही पीके मोठे उत्पन्न देऊन जातात. हा पिक घेत असल्याने काही लोकांना रोजगार मिळतो. हे पीक मुरुड तालुक्यातील तेलवडे, वाणदे, खारअंबोली, जोसरांजण, आदाड, शिघ्रे, काकळघर, बोर्ली, मांडला, वाणदे, वावडुंगी आदि गावातून मोठी लागवड केली जाते.

Exit mobile version