शेतकर्‍यांनी ई-पीक पाहणी करुन घ्यावी

| रायगड | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यामध्ये आंबिया बहार सन-2024-25 करिता युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत आंबा व काजू फळपिकांसाठी फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांनी विमा संरक्षित क्षेत्राची ई-पीक पाहणी पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

दि.12 जून, 2024 च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या निकषानुसार या विमा योजनेत सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांना ई-पीक पाहणे करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकर्‍यांनी आंबिया बहार सन 2024-25 मध्ये फळपीक विमा योजनेत सहभाग घेतलेला आहे. परंतु फळपिकांची ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्व्हे मोबाईल अ‍ॅपद्वारे केलेली नाही, त्यांनी दि.25 एप्रिलपर्यंत विमा संरक्षित क्षेत्राची ई-पीक पाहणी पूर्ण करुन घ्यावी. अन्यथा योजनेच्या निकषानुसार ई-पीक पाहणी नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील व फळपीक विम्याचा लाभा दिला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

Exit mobile version