पावसाच्या दांडीमुळे शेतकरी नाराज

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
जून महिन्यात पाऊस 1 तारखेला येणार अशा हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकरी खुष होता. शेताची भजनी, उकरानी, मशागत करून तयार होता. पण 7 तारीख होऊन गेली तरी पाऊस येत नसल्याने आभाळाकडे डोळे लावून नाराज होऊन बसला आहे. लवकर नांगरणी झाली तर शेती लावणीची कामे लवकर होणार व पीक लवकर मिळणार अशा स्वप्नात होता शेतकरी आता 12 तारखेची वाट पहात आहे. मुरुड तालीक्यात भातशेतीचे 3300 हेक्टर वर लागवड होते. परंतु पावसाच्या अनिमितेमुळे अनेक शेतकरी शेत लावत नाही, प्रत्यक्ष लागवड 2000 हेक्टरवर होते
खारआंबोळी परिसरातील शेतकर्‍यांनी जमीन नांगरणी करून धान्य पेरून ठेवले आहे. अचानक अति पाऊस झालेतर राब पेरता येत नाही. पाऊस जरी उशिरा झाला तरी धान्य खराब होत नाही फक्तपक्षी काही प्रमाणात धान्य खातात.
जून महिन्याचा पहिला आठवडा कोरडाच गेला आहे. शेतकरी रोज सकाळी ढगांकडे पाहून पाऊस कधी येईल यांची वाट बघतोय. साध्य पाऊसाची वेळ हवामान खात्यालादेखील नक्की सांगता येत नाही. मुरुड परिसरातील अनेक युवक मंडळी मुंबईत कामाला गेल्यामुळे 1500 हेक्टर जमीन ओसाड पडली आहे. अशी प्रतिक्रिया शेतकरी मनोज कामाने यांनी दिली.
मुरुड खरआंबोळी परिसरात शेतकर्‍यांनी जमिनीचे मशागत करून धान्य जमिनीत पेरले आहे .काकड उन्हात धान्य भाजून निघाल्याने राब चांगले येतेय .पण पाऊस लवकर येणार हा अंदाज चुकल्याने शेतकरी ढगाळ डोळे लावून बसलाय .रायगडात शेती बेभरोसे असल्याने लागवडीचे क्षेत्र कमी होत आहे, शासनाने यासाठी पर्यायी व्यवसायिकाची सोया करण्याची गरज आहे .नाहीतर सरकाच्या नुकसान भरपाईवर शेतकरी नेहमीच अवलंबून राहील.

Exit mobile version